चहाप्रेमींची पहिली पसंती...

चवीनं खाणाऱ्यांची
पहिली पसंती...

महाराष्ट्राच्या समृद्ध मसालेपरंपरेने आणि खाद्यसंस्कृतीच्या विविधतेने मला भुरळ घातली. याच प्रेरणेतून 'घाडगे बंधु मसाले' या मसालेदार प्रवासाची सुरुवात झाली!
ठाम ध्येय, अपार मेहनत आणि दृढ निश्चय यांच्या बळावर नवनिर्मितीचा ध्यास घेत श्री. विशाल घाडगे यांनी एका छोट्याशा खेडेगावातून या लघु गृहउद्योगाची स्थापना केली. या प्रवासात त्यांना त्यांच्या पत्नी, सौ. पुनम घाडगे यांची अनमोल साथ आणि प्रेरणा मिळाली.
अन्न प्रक्रिया क्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. याच उद्देशाने, पाच वर्षांच्या सखोल विचार आणि संशोधनानंतर, पारंपरिक पद्धतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत, कांडप मशीनद्वारे घरगुती पद्धतीने मसाले तयार करण्यास आणि विक्रीसाठी सज्ज झालो आहोत.
'घाडगे बंधु मसाले'च्या यशाचे रहस्य त्यांच्या अतुलनीय चवीत आहे, ज्याचे संपूर्ण श्रेय घाडगे बंधु कुटुंबीयांच्या मेहनतीला जाते. उत्कृष्ट चवीचे मसाले तयार करण्यासाठी त्यांची निःस्सीम समर्पणभावना आणि अथक प्रयत्न हेच त्यांच्या यशामागचे खरे कारण आहे.
हीच तळमळ आम्हाला निर्दोष उत्पादन प्रक्रिया, सूक्ष्म नियोजन, उत्कृष्ट व्यवस्थापन आणि सर्वोत्तम सेवा प्रस्थापित करण्यास मदत करते. याच गुणवत्तेमुळे 'घाडगे बंधु मसाले' आज एक विश्वासार्ह आणि आदर्श ब्रँड म्हणून ओळखला जातो.
सर्वोत्तम गुणवत्ता आणि उत्कृष्ट सेवेसह जागतिक स्तरावर 'घाडगे बंधु मसाले' ब्रँड पोहोचवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.
'घाडगे बंधु मसाले' ही यशोगाथा सिद्ध करते की कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणा नेहमीच यश मिळवून देतात. नवीन उद्योजकांना त्यांच्या व्यवसायाच्या प्रवासात योग्य मार्गदर्शन मिळावे, त्यांना नवीन संधी उपलब्ध व्हाव्यात आणि आवश्यक ते सहकार्य मिळावे, यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत. मसाला व्यवसाय हा केवळ आमच्या यशाचा आधार नाही, तर तो अनेक तरुण उद्योजकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. त्यांना उद्योग उभारणीच्या प्रक्रियेत मदत करणे, योग्य दिशा दाखवणे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. आम्ही फक्त उत्पादन विकत नाही, तर एक उद्योजकीय संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत.
माझा देव तोच आहे जो माझ्या ग्राहकांच्या हृदयात वसलेला आहे. जर मंदिरातील देवाला फसवणे मला शक्य नसेल, तर मी माझ्या ग्राहकांनाही कधीही फसवणार नाही.
माझ्या देशाने अभिमानाने पुढे जावे आणि त्यातील प्रत्येक माणूस आरोग्यदृष्ट्या सुदृढ राहावा, हीच माझी इच्छा आहे. म्हणूनच, माझा व्यवसाय नेहमी उच्च दर्जाची आणि प्रमाणित उत्पादने देईल आणि कधीही भेसळ व भ्रष्टाचारापासून दूर राहील.
- संस्थापक, विशाल संतोष घाडगे
जास्तीत जास्त लोकांना, विशेषतः महिलांना, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाला हातभार लावणे.
देशभरातील ग्राहकांना शुद्ध, उच्च दर्जाचे आणि परवडणारे मसाले उपलब्ध करून देणे, जे त्यांच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरतील आणि त्यांच्या आहाराला अप्रतिम चव व सुगंध देतील.
समृद्धी आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणे.
उत्कृष्ट चव, विनम्र सेवा आणि सातत्यपूर्ण नावीन्याच्या माध्यमातून ग्राहकांना सर्वोत्तम गुणवत्ता व सेवा देण्याची आमची वचनबद्धता आहे.